प्रज्ञान रोव्हर सुस्थितीत
देश-विदेश

प्रज्ञान रोव्हर सुस्थितीत

दहा महिन्यांनंतर मिळाली माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

इस्त्रोच्या ISRO चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत Chandrayaan-2 प्रज्ञान रोव्हरला घेऊन रवाना झालेल्या विक्रम लँडरचे चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग अयशस्वी झाले होते. मात्र आता जवळपास 10 महिन्यांनंतर प्रज्ञान रोव्हर अजूनही सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे. भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी नासाने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की , आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही, अशी माहिती दिली आहे.

तर, 4 जानेवारीच्या फोटोंवरुन(मे महिन्यात जारी झालेल्या) प्रज्ञान लँडर अजून शाबूत असून काही मीटर पुढे सरकल्याचं दिसतं. रोव्हर पुढे कसा सरकला असेल हे समजणं गरजेचं आहे, इस्त्रो याबाबत नेमकी माहिती देईल अशी अपेक्षा आहे, असं शनमुगा म्हणाले. तसेच, इस्त्रोकडून ( ग्राउंड टीमकडून) पाठवण्यात आलेल्या काही ब्लाइंड कमांड्स प्रज्ञानने फॉलो केल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com