करोना विरोधातील लढाईसाठी 23 हजार 123 कोटींचं पॅकेज

देशाचे नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांची घोषणा
करोना विरोधातील लढाईसाठी 23 हजार 123 कोटींचं पॅकेज

नवी दिल्ली / New Delhi - करोना (coronavirus) विरोधातील लढाईसाठी 23 हजार 123 कोटी रुपयांच्या आपत्कालीन पॅकेजला मान्यता देण्यात आल्याची माहिती देशाचे नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी पत्रकार परिषदेत दिली. करोना च्या तिसर्‍या लाटेविरोधात तयारी सुरु असल्याचेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया म्हणाले, एप्रिल 2020 मध्ये करोना चा शिरकाव झाला त्यावेळी पहिलं हेल्थ पॅकेज 15 हजार करोड रुपयांचा जाहीर करण्यात आले होते.

करोना च्या दुसर्‍या लाटेमध्ये देशाला मोठ्या समस्यांना समोरे जावे लागेल या स्थितीला भविष्यात कशाप्रकारे सामोरे जायचे यासाठी दुसरे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 23 हजार 123 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पॅकेजचा वापर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने 15 हजार करोड देण्यात येणार असून राज्य सरकारकडून 8 हजार करोड रुपये खर्च केले जाणार आहेत. सर्व राज्य सरकारसोबत चर्चा केल्यानंतर उपाययोजना सुरु केल्या आहेत. देशात दुसर्‍या लाटेमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली होती यामुळे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी तयारी केली जाणार आहे. भविष्यात लहान मुलांना कोरनापासून कसे सुरक्षित ठेवले जाईल याचा विचार करुन हे पॅकेज तयार करण्यात आले असल्याची माहिती मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com