COVID-19 Vaccination : १८ ते ४४ वयोगटाला ऑनलाईन नोंदणी न करताही मिळणार करोना लस

COVID-19 Vaccination : १८ ते ४४ वयोगटाला ऑनलाईन नोंदणी न करताही मिळणार करोना लस

दिल्ली | Delhi

देशात करोना विरुद्धचा लढा तीव्र करताना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील लोकांना नोंदणी न करता लसीकरण केले जात आहे.

मात्र, १८ ते ४४ वर्षांच्या लोकांसाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे बंधनकारक होते. तसेच चार आकडी कोड नंबरही आवश्यक करण्यात आला होता. मात्र, आता याची आवश्यकता लागणार नाही. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १८ वर्षांवरील लोकांना व्हॅक्सिनबाबतच्या नियमात बदल केला आहे.

नवीन नियमानुसार ते आता सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष नोंदणी करून बुकिंग करू शकतील. ही सुविधा सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर असणार असे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना ही माहिती दिली आहे. या सुविधेने नागरिक आणि लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष लसीकरणाची नोंदणी आणि लस दोन्ही एकदाच करू शकतील. पण, महाराष्ट्रात सध्या लसींच्या कमतरतेमुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण अनेक ठिकाणी बंद आहे.

का घेतला निर्णय?

काही राज्यांमध्ये लोक ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी गैरहजर राहतात. त्यामुुळे ती लस वाया जाण्याची शक्यता असते. ग्रामीण भागातही ऑनलाईन नोंदणीबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. या सर्व गोष्टींचा विचार करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगत आहे. ऑनलाईनमुळे प्रक्रियेमुळे राहिलेली लस वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फोन नंबरवरून ४ जणांची अपॉईंटमेंट घेण्याची सुविधा सरकारनं दिली असली, तरी त्यानंतरही ज्या लोकांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन नाही त्यांना लस घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.

दरम्यान ही सुविधा केवळ सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी अद्याप ऑनलाइन नोंदणीद्वारेच स्लॉट बुक करावे लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते-ते संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून आहे की, त्यांना हा निर्णय लागू करायचा आहे की नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com