20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करण्याचे केंद्र सरकारचे तेल कंपन्यांना आदेश

20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करण्याचे केंद्र सरकारचे तेल कंपन्यांना आदेश

सुखदेव फुलारी

एप्रिल 2023 पासून 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व तेल कंपन्यांना दिले आहेत.सध्या पेट्रोल मध्ये 10 टक्के येथेनॉलचे मिश्रण केले जात आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने दि.2 जून रोजी या बाबदची अधिसूचना जारी केली आहे. त्यात म्हंटले आहे की, केंद्रीय तेल कंपन्या 20 टक्केवारीने इथॅनॉल ब्लेंडेड पेट्रोलची विक्री करतील असे सरकारचे निर्देश आहेत. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स नुसार सर्व राज्य व केंद्र शासीत प्रदेश संपूर्ण भागात इथॅनॉल 20 टक्क्यांपर्यंत मिश्रण असलेले पेट्रोल विक्री करतील.

ही अधिसूचना दि. 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल. तेल आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकारने 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वी सरकारने 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्यासाठी 2030 पर्यंतची अंतिम मुदत दिली होती. आणि आता ही मुदत एप्रिल 2023 करण्यात आली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे की, “केंद्र सरकार आदेश देते की तेल कंपन्या भारतीय मानक ब्युरोच्या निर्देशांनुसार सर्व राज्य व केंद्रशासित परदेशाचे सर्व भागात 20 टक्के पर्यंत इथेनॉलच्या टक्केवारीसह इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करावी. ही अधिसूचना दि. 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल.”

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com