ज्येष्ठ नागरिकांनो बातमी तुमच्यासाठी! बुस्टर डोस घेण्यासाठी केंद्राची नवी नियमावली

ज्येष्ठ नागरिकांनो बातमी तुमच्यासाठी! बुस्टर डोस घेण्यासाठी केंद्राची नवी नियमावली

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतात (India) तीन जानेवारी २०२१ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे करोनावरील (Corona) लसीकरण (Vaccination) सुरू होणार आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस (Precision dose) म्हणजेच तिसरा डोस देण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) माहिती दिली आहे…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या ज्येष्ठ नागरिकांना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांना डॉक्टरांचे सर्टीफिकेट (Certificate) किंवा इतर कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक नसेल, असे स्पष्ट कण्यात आले आहे.

मात्र गंभीर आजार असलेल्या ६० वर्षांवरील व्यक्तींनी प्रथम आपल्या डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा. सल्ला घेतल्यानंतरच व्यक्तीने लसीचा तिसरा डोस (Third Dose) घ्यावा, अशी सूचनादेखील आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

दरम्यान, फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, गंभीर आजार असणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना करोनावरील लसीचा तिसरा डोस दिला जाईल, असे केंद्र सरकारने (Central government) काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. मात्र तिसरा डोस घेण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर ३९ आठवडे पूर्ण झालेले आणि हे ९ महिने असावे, असेदेखील केंद्राने सरकारने स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com