केंद्र सरकारची 162 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी

केंद्र सरकारची 162 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली -

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. ही गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्रसरकारनं 162 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या कामावर 201 कोटी रुपये खर्च होणार असून त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीक्षमतेत 154 टनांची भर पडेल. यापैकी 33 प्रकल्पांची संयंत्र कार्यान्वित झाली असून त्यातलं एक महाराष्ट्रात आहे.

आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली,केरळ, पुद्दुचेरी, पंजाब, आणि उत्तर प्रदेशमध्येही प्रत्येकी एक प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. मध्य प्रदेशात 5, हिमाचल प्रदेशात 4,तर चंडीगढ, गुजरात आणि उत्तराखंड मधे प्रत्येकी 3 प्रकल्प कार्यान्वित आहे. बिहार, कर्नाटक आणि तेलंगणमधे प्रत्येकी 2 प्रकल्प सुरु झाले आहेत.

या महिनाअखेरपर्यंत देशभरात आणखी 59 तर पुढच्या महिनाअखेरपर्यंत आणखी 80 प्रकल्प उभे राहतील. राज्यांनी या उपाययोजनेचे स्वागत केले असून आणखी 100 संयंत्र सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यालाही मंजुरी देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com