
दिल्ली l Delhi
तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
आज रावत यांना १७ तोफांची सलामी देत दिल्लीतील छावणी परिसरात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Bipin Rawat Last Rites) करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीला देखील अखेरचा निरोप देण्यात आला.
त्यांची मोठी मुलगी कृतिका हिने आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. कृतिका यांनी रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.