नवी दिल्ली -

करोना संकटामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत सीबीएसई ची परीक्षा होणार नसल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी सांगितले आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन च्या बोर्ड परीक्षांबाबत त्यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता फार कमी आहे. येणारी परिस्थिती पाहून परीक्षेची तारीख ठरवली जाईल.

देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन शिक्षणाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पोखरीयाल म्हणाले, दरवर्षी 15 फ्रेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा कधी घेता येईल याविषयी विचार-विनिमय केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. परीक्षेविषयीची सर्व माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल. लाइव्ह वेबिनारदरम्यान शिक्षण मंत्री म्हणाले की, करोना काळात शिक्षकांनी योद्धाप्रमाणे मुलांना शिकवले. यासाठी त्यांचे आभार.