सीबीएसई : बारावीच्या परीक्षेबाबत उद्या निर्णय

स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षांबाबतही होणार निर्णय
सीबीएसई : बारावीच्या परीक्षेबाबत उद्या निर्णय

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही? याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक उद्या (23 मे) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्री तसेच सचिवांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत.

मंत्री पोखरियाल यांनी ट्विट करुन बैठकीबाबत माहिती दिली आहे. या बैठकीत इयत्ता बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्याच्या बैठकीत इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षांबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.

देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्री आणि सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे बैठक घेतली जाणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रमेश पोखरियाल यांच्यासोबतच बैठकीला महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी तसेच केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर देखील उपस्थित राहणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com