दिल्ली । Delhi

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई (CBSE) बोर्डाने शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये होणाऱ्या दहावी (CBSE class 10th board exams) आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा (CBSE Class 12th board exams date) जाहीर केल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी केलेल्या सूचना सीबीएसई बोर्डाने विचारात घेणार असून आगामी परीक्षांचे आयोजन करताना त्यानुसार आवश्यक तयारी करण्यात येणार आहे.

CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होणार आहेत, अशी घोषणा भारताचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. CBSE बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा आज (31 डिसेंबर) संध्याकाळी 6 वाजता जाहीर करणार असल्याचं पोखरियाल यांनी सांगितलं होतं. त्यानुसार पोखरियाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा केली. त्यानुसार, CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होतीलय. 10 जूनपर्यंत या परीक्षा संपवण्यात येतील. परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत लावण्यात येणार आहे. बोर्डच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून सुरू होतील, असंही पोखरियाल यांनी सांगितलं.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी काही दिवसांपूर्वी एका वेबिनारद्वारे शिक्षकांसोबत संवाद साधताना परीक्षा आयोजनावर म्हटलं होतं की, सीबीएसई बोर्डाच्या 24 हजारांहून अधिक शाळा या ग्रामीण भागात आहेत त्यामुळे ऑनलाईन परीक्षा सध्यातरी शक्य नाहीयेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील.

सीबीएसई बोर्डाच्या 2021 या वर्षात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी महत्वाचे कागदपत्र म्हणजे हॉल तिकिट आहे. परीक्षेपूर्वी बोर्डाकडून विद्यार्थ्यांना हॉलतिकिट दिले जातात. नियमित विद्यार्थ्यांसाठी शाळांकडून हॉलतिकिट दिले जातात तर इतर विद्यार्थी हे बोर्डाच्या वेबसाईटवरुन हॉलतिकिट डाऊनलोड करु शकतात. बोर्डाकडून हॉल तिकिट हे विद्यार्थ्यांना 2021 मध्येच मिळणार असून त्याची अधिकृत तारीख आणि इतर माहिती बोर्डाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.