
दिल्ली | Delhi
जमीन-नोकरी घोटाळा (Land Jobs Scam) प्रकरणात लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयने यापूर्वी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांची चौकशी केली होती.
तर आता सीबीआयनं आपला मोर्चा लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याकडे वळवला आहे. या प्रकरणी सीबीआयनं तेजस्वी यादवला दुसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना शनिवारी (११ मार्च) चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात बोलावण्यात आलं आहे.
दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव हे त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीमुळे आज सीबीआयसमोर हजर राहू शकत नाहीत. अशी माहिती समोर येत आहे. तेजस्वी यादव यांनी सीबीआयकडे वेळ मागितली आहे. ईडीच्या छाप्यानंतर त्यांच्या पत्नीला काल दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्या गरोदर आहेत. १२ तासांच्या चौकशीनंतर ती बीपीच्या समस्येमुळे बेशुद्ध पडली.