दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचा छापा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचा छापा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दिल्लीतून एक महत्वाचे वृत्त समोर येत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापा मारला आहे. याबाबत मनिष सिसोदिया यांनी ट्विट करत माहिती दिली आहे...

सिसोदिया यांनी ट्विट केले आहे की, आपल्या घरी सीबीआय (CBI) आल्याची माहिती दिली. त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

त्यामुळे आपला देश अजून नंबर-1 बनला नाही. दिल्लीच्या (Delhi) शिक्षण (Education) आणि आरोग्याच्या (Health) उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण आरोग्याचे चांगले काम बंद पडावे म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचा छापा
मविप्र निवडणूक : आमदार माणिकराव कोकाटेंची माघार

आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात (Court) सत्य बाहेर येईल. आम्ही सीबीआयचे (CBI) स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणे करून सत्य लवकर बाहेर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com