मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, लुकआऊट नोटिस जारी

लूक आऊट नोटीस म्हणजे नेमकं काय? (What is a look out notice?)
मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, लुकआऊट नोटिस जारी

दिल्ली | Delhi

केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) दिल्लीचे (Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासह १३ जणांविरोधात लूक आऊट (Look Out Circular LOC) नोटीस जारी केली आहे.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी (Delhi Excise Policy scam) ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने सिसोदिया यांच्यासह १४ जणांवर एफआयआर दाखल केली आहे. (CBI issues Look Out Circular (LOC) against all accused including Delhi Dy CM, Manish Sisodia, named in the Delhi Excise Policy scam)

दरम्यान लुकआउट नोटीस जारी होण्यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी पीएम मोदींचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पीएम मोदी सीबीआयच्या छाप्यासाठी तत्कालीन यूपीए सरकारला घेरताना दिसत आहेत, ते गुजरातला बदनाम करण्यासाठी सीबीआय छापे टाकत असल्याचं सांगत आहेत. सरकार एजन्सीचा वापर करत आहे.

तसेच हा व्हिडीओ शेअर करताना "हळूहळू, ऋतू देखील बदलत राहतात, तुमच्या गतीने, वारे देखील आश्चर्यचकित व्यक्त करत आहेत सर." अशी खोचक कॅप्शन दिली आहे.

लूक आऊट नोटीस म्हणजे नेमकं काय? (What is a look out notice?)

लूक आऊट सर्क्युलर (LOC) किंवा लूक आऊट नोटीस सर्क्युलर पत्र आहे. लूक आऊट नोटीस ही फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी देखील काढण्यात येते. बऱ्याच वेळा असं होत की आरोपी सीमेवर किंवा मग विमानतळावर पकडले जातात. कारण त्या आरोपींविरोधात काढलेली लूक आऊट नोटीस ही त्या त्या देशातील अधिकाऱ्यांकडे असते. लुक आउट नोटीसचा वापर आंतरराष्ट्रीय सीमेवर इमिग्रेशन तपासणीसाठी केला जाऊ शकतो. उदा. आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा सागरी भाग, बंदर. लूक आउट नोटीस जारी करणाऱ्या एजन्सीच्या विनंतीवरून इमिग्रेशन अधिकारी आरोपी व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com