
दिल्ली | Delhi
हरियाणाच्या यमुना नगर या वर्दळीच्या परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भरदिवसा एका महिलेचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र महिलेच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या यमुना नगरमध्ये ही महिला जीमवरुन परत येत असताना ती आपल्या कारमध्ये बसुन घरी येण्यास निघाली. तोच चार अज्ञातांनी महिलेच्या कारमध्ये शिरुन तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला पण महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला.
दरम्यान या अपहरणा संबंधीत तक्रार दाखल केली असुन यमुना नगर पोलिस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती डिएसपी कमलदीप सिंह यांनी दिली आहे.