
मुंबई | Mumbai
योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा रामदेव यांना मुस्लिमांविरोधात केलेले वादग्रस्त विधान भोवले आहे...
त्यांनी २ फेब्रुवारी रोजी राजस्थानातील (Rajasthan) बारमेर येथे एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधील काही लोकांना संपूर्ण जगाला त्यांच्या धर्मात घेण्याचे वेड लागले आहे. पण हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगले वागण्यास शिकवतो.
मुस्लिम लोक दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतात त्यानंतर त्यांना पाहिजे ते करतात. ते हिंदू मुलींचं अपहरण करतात आणि त्यांच्यासोबत सर्व प्रकारचे पाप करतात. या वक्तव्यानंतर बाबा रामदेव यांच्यावर राजस्थानातील चौहाटन पोलीस ठाण्यात १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.