पत्नीला प्रसूतीगृहाकडे नेताना कारने घेतला अचानक पेट; दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

पत्नीला प्रसूतीगृहाकडे नेताना कारने घेतला अचानक पेट; दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

एक गर्भवती महिला आपल्या पतीसह कारमधून जात होती. यावेळी कारने अचानक पेट घेतला. कार अचानक पेटल्यामुळे गर्भवती महिलेचा आणि तिच्या पतीचा जळून मृत्यू झाला आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, केरळमधील कन्नूर येथे एका महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे या महिलेला कारमधून रूग्णालयात नेण्यात येत होते. त्याचवेळी कारला अचानक आग लागली. या घटनेत गर्भवती महिला आणि तिच्या पतीचा जळून मृत्य झाला आहे.

कार जळताना पाहून प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि कारला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र ड्रायव्हर सीट आणि त्याशेजारील सीटवर बसलेले पती-पत्नी वाचू शकले नाहीत.

पत्नीला प्रसूतीगृहाकडे नेताना कारने घेतला अचानक पेट; दाम्पत्याचा होरपळून मृत्यू
धक्कादायक! शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या

रिशा (२६) आणि प्रजित (३५) असे मृत जोडप्याचे नाव आहेत. कारमधून सुखरुप बाहेर पडलेल्या चौघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील इतर चौघांना किरकोळ दुखापात झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारला आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com