दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती! कारने विद्यार्थ्याला दीड किमीपर्यंत फरफटत नेले, काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर

दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती! कारने विद्यार्थ्याला दीड किमीपर्यंत फरफटत नेले, काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर

लखनऊ | Lucknow

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीमधील भीषण अपघाताने संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. या भीषण अपघातात युवतीला १३ किमी फरफटत नेले होते, या अपघातात निष्पाप तरुणीला जीव गमवावा लागला होता.

ही अंगावर काटा आणणारी बातमी ताजी असतानाच अशाच प्रकारच्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडली आहे. उत्तरप्रदेशमधील हरदोई येथे ही घटना घडली आहे. येथे सायकलवर कोचिंगसाठी जात असलेल्या एका विद्यार्थ्याला कारने धडक दिली.

दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती! कारने विद्यार्थ्याला दीड किमीपर्यंत फरफटत नेले, काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर
Air India च्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा 'तो' विकृत गजाआड
दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती! कारने विद्यार्थ्याला दीड किमीपर्यंत फरफटत नेले, काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर
खळबळजनक! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

या अपघातानंतर कारने विद्यार्थ्याला तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफरटत नेलं. शहरातील मुख्य बाजारपेठ सिनेमा रोडवर अनेक लोकांनी कारचा पाठलाग करून त्या कार चालकाला पकडले. विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती! कारने विद्यार्थ्याला दीड किमीपर्यंत फरफटत नेले, काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर
आमदार योगेश कदमांच्या कारला भीषण अपघात, घातपाताचा संशय

घटनेनंतर स्थानिक लोकांनी कारची तोडफोड करत गाडी पलटी केली. यासोबतच चालकाची धुलाईही केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी पोहोचत कार चालकाला ताब्यात घेतलं.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com