
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जगभरात सध्या अपघातांच्या (Accident) प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा अपघातांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात...
अपघाताचा असाच एक फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा फोटो पाहून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.
उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केलेला आहे. या फोटोत दिसून येत आहे की, एका कारची दुचाकीशी धडक झाली आहे. अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या धडकेत कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
हर्ष गोयंका यांनी म्हंटले आहे की, तुमच्याकडे योग्य मजबूत टायर असल्यास हे शक्य आहे. यासोबतच त्याने एक इमोजीही शेअर केला आहे. या फोटोवर अनेक गमतीशीर कमेंट्स येत आहेत. तर नेटकऱ्यांनी लाईक्स पाऊस पाडला आहे.