वर्षाअखेर कराेना लसीचे 40 लाख डोस
देश-विदेश

वर्षाअखेर कराेना लसीचे 40 लाख डोस

प्रसिध्दी भारतीय लस उत्पादक कंपनीचा दावा

Nilesh Jadhav

पुणे | Pune

करोना लसीबाबत आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेल्या लसीचे डिसेंबरपर्यंत 30 ते 40 लाख डोस तयार होईल, असे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने याला दुजोरा दिला आहे. या संस्थेचे प्रमुख पूनावाला यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.

"ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी लस तयार करण्यासाठी निवडलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत." असे पूनावाला यांनी म्हंटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com