बिहार निवडणूकीसह विविध राज्यातील पोटनिवडणूका एकत्रित होणार

निवडणूक आयोगाची माहिती
बिहार निवडणूकीसह विविध राज्यातील पोटनिवडणूका एकत्रित होणार

देशातील पूरपरिस्थिती आणि covid19 मुळे अनेक पोटनिवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणूक लांबणीवर पडली आहे. आज याबाबत निवडणूक आयोगाच्या आढावा बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

निवडणूक आयोगाने(Election Commission of India) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, "बिहार विधानसभा निवडणूका (bihar assembly elections) आणि विविध राज्यांमधील 65 विधानसभा आणि संसदीय जागांवर पोटनिवडणूका एकाच वेळी होतील. या निवडणूका एकत्रित घेतल्यामुळे कायदा, सुव्यवस्था यांची अंमलबजावणी होणे काहीसे सोपे होईल. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबर रोजी समाप्त होत असल्याने या दोन्ही निवडणूका एकत्रित घेण्यात येणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक आणि 65 पोट निवडणूकांच्या तारखा योग्य वेळी जाहीर करण्यात येतील." असे या निवेदनात म्हंटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com