भरधाव बस अचानक उलटली; एक मृत्यू, ४५ जखमी

भरधाव बस अचानक उलटली; एक मृत्यू, ४५ जखमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात एक विचित्र अपघात घडला आहे. भरधाव बस अचानक उलटली असून या अपघातात एक मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे...

बस वेगाने येत आहे. बसच्या पुढे एक रुग्णवाहिका जात आहे. काही लोक रोडवरून चालताना दिसून येत आहे. बस रोडच्या खाली अचानक उतरुन उलटती. बस उलटल्यानंतर बसच्या वर बसलेले प्रवाशी बस खाली दबले गेले. हा संपर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

रविवारी सकाळी कटवा-बीरभूम राज्य महामार्गावर हा अपघात झाला. अपघातातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com