मोठी दुर्घटना! आझाद मार्केटमध्ये ४ मजली इमारत कोसळली

३ जणांचा मृत्यू, लहान मुलं अडकल्याची भीती
मोठी दुर्घटना! आझाद मार्केटमध्ये ४ मजली इमारत कोसळली

दिल्ली | Delhi

दिल्लीतील आझाद मार्केट परिसरात बांधकाम सुरू असलेली चार मजली इमारत कोसळली (Building Collapse) आहे.

या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर लहान मुलांसह अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जुनी दिल्लीतील बडा हिंदुराव पोलिस स्टेशन अंतर्गत आझाद मार्केटच्या शीशमहल परिसरात बांधकाम सुरू असलेली चार मजली इमारत कोसळली. सुमारे महिनाभरापासून या इमारतीचे बांधकाम सुरू होते. ही इमारत कोसळल्याने आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले आहे. त्यातही अनेक लोक गाडले गेले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com