दिल्ली l Delhi

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उल्लेख केला. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं कौतूक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे फायद्याचे असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली.

नवे कृषी कायदे लागू झाले तरीही जुन्या व्यवस्थेच्या अंतर्गत असलेल्या सुविधा, अधिकार यामध्ये बदल केले जाणार नाहीत अशी माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणातून पुन्हा दिली आहे. मोदी सरकार स्वामीनाथन आयोग लागू करत दीडपट अधिक MSP देणार अशी माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिली आहे. यासोबतच खरेदी केंद्र देखील वाढवली जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे भारतातील लोकशाही मजबूत झाली. केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा देशातील जनतेला झाला. कोरोनानं आत्मनिर्भर भारताचं महत्व पटवून दिलं. कमी कालावधीमध्ये 200 प्रयोगशाळा निर्माण केल्या. भारत सर्वात मोठं लसीकरण अभियान चालवतोय, याचा अभिमान असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हंटल आहे.

तसेच सहा राज्यात गरिब कल्याण योजना सरकारने राबवली, सरकारच्या प्रयत्नांमुळे गरिबांची मदत झाली आहे, त्यांना सुविधा मिळाली आहे, ओरोग्याबाबत गरिब जनतेचा खर्चही वाचला आहे, अशी माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली.

तसेच, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा 10 कोटी छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं करेल. पूर्वीच्या कायद्यातील सुविधा रद्द करण्यात आल्या नाहीत. कृषी कायद्यांविषयी गैरसमज पसरवण्यात आले ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 100 किसान रेल्वे सुरु केल्या असल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली.

नोकरभरतीमध्ये अनेक वेगवेगळ्या परिक्षा बंद झाल्या आहेत. ग्रुप सी, डी मध्ये नोकरभरतीत मुलाखत बंद झाल्याने युवकांना लाभ झाला आहे. आता नॅशनल रिक्रुटमेंट एजंसी निर्माण झाल्याने नोकरभरती वेगवान झाली आहे. असे राष्ट्रपतींनी म्हंटले आहे.