
दिल्ली l Delhi
तमिळनाडूतील कुन्नूरनजीक भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
CDS बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले ब्रिगेडियर एलएस लिद्दर यांच्यावर आज सकाळी ९.३० वाजता दिल्ली कॅन्टमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी पत्नी गीतिका या भावूक झाल्या. ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांचा फोटो आणि राष्ट्रध्वज हाती त्यांच्या देण्यात आला.
माझे वडिल हिरो होते, माझे बेस्ट फ्रेंड होते - आसना लिड्डर
माझे बाबा १७ वर्ष आमच्या सोबत होते. १७ वर्षांच्या सुंदर आठवणीसोबत पुढं जायंच आहे. बाबांचं जाणं ही देशाची हानी आहे. माझे वडिल हिरो होते. माझे बेस्ट फ्रेंड होते, ते माझ्यासाठी सर्वाधिक प्रेरित करणारे व्यक्ती होते, असं आसना हिनं म्हटलं आहे.
तत्पूर्वी, ब्रिगेडियर एलएस लिडर यांच्या पत्नी आणि मुलीने बेरार स्क्वेअर येथे त्यांना श्रद्धांजली वाहिली. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही तेथे हजेरी लावली होती. ब्रिगेडियर लिडर यांच्या मुलीने त्यांना मुखाग्नि दिला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.