भारतीय हवाई दलाचं MiG-21 विमान कोसळलं; पायलटचा मृत्यू

भारतीय हवाई दलाचं MiG-21 विमान कोसळलं; पायलटचा मृत्यू

दिल्ली | Delhi

भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) मिग-21 (MiG 21) हे लढाऊ विमान काल संध्याकाळी राजस्थानमधील जैसलमेरजवळ कोसळले (Crash) आहे. या दुर्घटनेत पायलटच्या मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशदरम्यान विमान जमिनीवर कोसळल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर, गावातील लोक सर्वप्रथम घठनास्थळी पोहोचले. यानंतर माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनही घटना स्थळी पोहोचले. संबंधित वैमानिकाला वाचविण्याचाही प्रयत्न करण्यात आला, पण ते गंभीररित्या भाजले होते आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

हे विमान नेमके कशामुळे क्रॅश झाले हा तपासाचा विषय आहे. मात्र, खराब हवामान होते, तांत्रिक बिघाड झाला होता, की आणखी काही कारणामुळे विमान कोसळले, यासंदर्भात हवाई दलाकडून तपशीलवार तपास केला जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com