Philippine Plane Crash : मोठी दुर्घटना! ८५ जण प्रवास करणारे सैन्याचं विमान कोसळलं

बचावकार्य सुरु
Philippine Plane Crash : मोठी दुर्घटना! ८५ जण प्रवास करणारे सैन्याचं विमान कोसळलं

दिल्ली | Delhi

फिलिपिन्समध्ये एका लष्कराच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी विमानात ८५ जण होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे विमान दक्षिणेतील कागायन डी ओरो शहरातून सैन्याला घेऊन जात होते. सैन्य दल सुलुच्या मुस्लिम बहुल प्रातांत अबु सय्याफ दहशतवाद्यांविरोधात गेल्या अनेक दशकांपासून लढत आहे. विमान रनवेवर उतरु शकलं नाही. वैमानिकाने विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला तसं करता आलं नाही. विमानाचा अपघात झाला.

फिलीपिन्स लष्करप्रमुख सिरिलिटो सोबेजान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानातील लोकांना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत १७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ४० जणांना वाचवण्यात यश आलंय.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com