Covaxin खरेदीवरुन ब्राझीलचं राजकारण तापलं

ब्राझीलच्या राष्ट्रपतींच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाची मंजुरी
Covaxin खरेदीवरुन ब्राझीलचं राजकारण तापलं

दिल्ली | Delhi

भारतीय बनावटीची लस कोवॅक्सिनवरुन (Bharat Biotech's Covaxin) ब्राझिलमधील वातावरण प्रचंड तापले आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health of Brazil) भारत बायोटेकसोबत झालेला दोन कोटी लस खरेदीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो (President Jair Bolsonaro) यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये ब्राझील सरकारने (Brazil Govt) हैदराबादमधील (Hyderabad) लस निर्मिती कंपनी असलेल्या भारत बायोटेकशी (Bharat Biotech) दोन कोटी लसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता ( Bharat Biotech Brazil Covaxin Deal). यामध्ये एका डोसची किंमत १५ डॉलर (जवळपास १११७ रुपये) सांगण्यात आली. तर, दिल्लीतील ब्राझील दूतावासाच्या एका गुप्त माहितीनुसार कोवॅक्सिन लशीच्या एका डोसची किंमत १.३४ डॉलर (जवळपास १०० रुपये) होती.

लस खरेदीच्या घोटाळ्यावरून ब्राझीलमधील विरोधी पक्षांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी (Opposition MPs) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी ९० दिवसांत पूर्ण करून सुप्रीम कोर्टाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. यात राष्ट्रपतींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे विरोधकांनी पुन्हा ब्राझिल सरकारविरोधात आरोपांची राळ उठवली आहे. त्यामुळे तेथील वातावरण आणखीनच तापले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात करार रद्द झाल्याने भारतीय कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com