दिल्ली । Delhi

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI ने दोन करोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत DCGI ने ही माहिती दिली आहे. DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. तसेच, दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित असल्याचं डीसीजीआयचे संचालक व्ही.जी.सोमाणी यांनी सांगितलं आहे.काय म्हंटले होते आशुतोष सिन्हा?

समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी म्हंटल होत की, 'करोना वॅक्सीनमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकतं.' असं खळबळजनक विधान त्यांनी केलं होत.

दरम्यान करोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येतं असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना विचारलं असता, “असं म्हणणं साफ चुकीचं आहे ” असं सोमानी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच “तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा की कशातही सुरक्षिततेची शंका असेल, जराही शंका असेल तर आम्ही त्याला कधीच मान्यता देणार नाही. लसी ११० टक्के सुरक्षित आहेत. थोडेफार दुष्परिणाम असतातच जसे की दंडावर दुखणं, थोडासा ताप येणं, थोडीशी अॅलर्जी होणं हे तर प्रत्येक लसीसाठी सामान्य आहे.” असं माध्यमांशी बोलताना व्ही जी सोमाणी यांनी सांगितलं आहे.

काय म्हंटले होते आशुतोष सिन्हा?