Bipin Rawat : अखेर हेलिकॉप्टरचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला; अपघाताचे कारण समोर येणार?

ब्लॅक बॉक्स काय प्रकार आहे?, ब्लॅक बॉक्स कसं काम करतो?
Bipin Rawat : अखेर हेलिकॉप्टरचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला; अपघाताचे कारण समोर येणार?

दिल्ली l Delhi

तमिळनाडू मधील कुन्नुर येथे काल (8 डिसेंबर) लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यामध्ये CDS सीडीएस बिपीन रावत यांच्यासह पत्नी आणि लष्करातील अन्य जवानांचे निधन झाले.

एअर चिफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून त्यांच्यासोबत तामिळनाडूतील फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटचं एक पथक या अपघाताचा तपास करत आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर महत्वाची गोष्ट म्हणजेच ब्लॅक बॉक्स तपासयंत्रणांच्या हाती लागलेला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणापासून ३०० मी ते १ किलोमिटरपर्यंतचा परिसर कसून तपासला जात आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळू शकणार आहे.

ब्लॅक बॉक्स काय प्रकार आहे?

प्रत्येक विमान किंवा हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होते. डेटा रेकॉर्डर हे ब्लॅक बॉक्सचं एक फंक्शन आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये हेलिकॉप्टरची शेवटची उड्डाण म्हणजेच अंतिम स्थिती आणि इतर काही माहिती यामधून मिळते. एखाद्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी हे उपकरणं महत्त्वाचं असते. खासकरून फोरेन्सिक तपासातून हेलीकॉप्टर दुर्घटनेविषयी माहिती मिळू शकते.

कसं काम करतो?

हा बॉक्स टायटॅनियम धातू आणि आतमध्ये अनेक स्तरांमुळे सुरक्षित आहे. विमानात आग लागली तरी त्याला हानी पोहचण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. कारण तो १ तास १० हजार डिग्री सेंटीग्रेड तापमान सहन करू शकतो. यानंतरही पुढील २ तास हा बॉक्स सुमारे २६० अंश तापमान सहन करू शकतो. त्याची एक खासियत म्हणजे तो जवळपास महिनाभर विजेशिवाय काम करतो, म्हणजेच अपघातग्रस्त जहाज शोधण्यात वेळ लागला तरी डेटा बॉक्समध्ये सेव्ह होतो.

दरम्यान या अपघाताची एअर मार्शल मानवेंद्रसिंग (Air Marshal Manvendra Singh) यांच्या नेतृत्वाखाली चौकशी केली जात असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले. मानवेंद्र सिंग हे भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडर असून ते स्वतः हेलिकॉप्टर पायलट आहेत.

एअर मार्शल सिंग २९ डिसेंबर १९८२ रोजी हेलिकॉप्टर पायलट म्हणून भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये सामील झाले. त्यांनी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रयागराजमध्ये मध्य हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com