उत्तर प्रदेशात तालिबानी राज; नाना पटोले यांचा हल्लाबोल

उत्तर प्रदेशात तालिबानी राज; नाना पटोले यांचा हल्लाबोल

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट (Ajay Singh Bisht) यांच्या नेतृत्वाखालील तालिबानी राज असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी केली...

केंद्रीय कृषी कायद्याच्या (Agriculture Bill) विरोधात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे आंदोलन (Agitation) करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या मुलाने आपल्या गाडीखाली चिरडले.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. या घटनेचा निषेध म्हणून पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन (Agitation) केले. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी आज उत्तर प्रदेश सरकारवर (Uttar Pradesh Government) टीकास्त्र सोडले.

मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार आटापिटा करत आहे. तर पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत, असा आरोप पटोले यांनी केला.

प्रियंका गांधी यांना भाजप आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का घाबरतात? पीडित कुटुंबियांना भेटणे भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का? असा सवालही पटोले यांनी केला.

मोदी आणि योगी सरकार बरखास्त करा

देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भाजपच्या सरकारने (BJP Government) आखले असून शेतकरी (Farmers) संपवण्याचे पाप केले जात आहे. आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची ही संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्तीचे निदर्शक असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपचे केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणीही पटोले यांनी केली.

Related Stories

No stories found.