बॉलिवूड स्टार पाकिस्तानचे हस्तक?
देश-विदेश

बॉलिवूड स्टार पाकिस्तानचे हस्तक?

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रवक्ते बैजयंत जय पांडा यांनी खळबळजनक दावा

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

भाजपचे bjp राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रवक्ते बैजयंत जय baijayant panda पांडा यांनी बॉलिवूडबाबत खळबळजनक दावा केला आहे. भारतातील काही बॉलिवूड कलाकारांचे पाकिस्तान आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर असा दावा केला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, "बॉलिवूडमधील काही व्यक्तींचे काश्मीरमध्ये हिंसा पसरवणाऱ्या तसेच अनिवासी भारतीयांसोबत वैयक्तीक संबंध आहेत. हे संबंध दाखवणारे काही कागदपत्रं मी बघितली आहे. काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि आयएसआयशी असलेले संबंध यामधून उघड होत आहे. मी बॉलिवूडमधील देशभक्तांना आवाहन करतो की अशा लोकांबरोबर त्यांनी काम करु नये." असे त्यांनी म्हंटले आहे.

बैजयंत जय पांडा यांच्या दाव्याने बॉलिवुडसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com