
नवी दिल्ली | New Delhi
उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) अलिगडमधील (Aligarh) भाजप खासदार (BJP MP) सतीश गौतम (Satish Gautam) यांचा एका महिला आमदारासोबत भरसभेत गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे गौतम यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या कोल विधानसभा मतदारसंघात (Kol Assembly Constituency) आमदार अनिल पाराशर (MLA Anil Parashar) यांच्यातर्फे पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनेक भाजपचे नेते आले होते. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री दयाशंकर सिंह आणि उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय हे देखील उपस्थित होते. यावेळी सर्व नेते व्यासपीठावर बसले होते.
त्यावेळी व्यासपीठावर या व्हिडीओत भाजपचे खासदार सतीश गौतम हे महिला आमदार मुक्ता राजा (MLA Mukta Raja) यांच्या शेजारी बसल्याचे दिसत आहे. तसेच यावेळी सतीश गौतम यांनी मुक्ता राजा यांचा हातावर हात ठेवतात. यावर महिला आमदार नाराज होते. त्यानंतर सतीश गौतम यांनी महिलेचा खांदा दाबल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, यानंतर ही घटना उपस्थितांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) झाला आहे. तसेच हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
व्हायरल व्हिडिओवर भाजपकडून प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून (BJP) प्रतिक्रिया देण्यात आली आहे. खासदार आणि आमदार यांच्यामध्ये आई-मुलासारखे नातं आहे. पण, काही विरोधकांनी राजकारणाची पातळी किती खाली आणली आहे हे यावरुन दिसते. यातून त्यांना आई-मुलगा किंवा भाऊ-बहिणीचे नाते दिसले असते. पण, त्यांची नियत वाईट आहे, असे भाजपने म्हटले.