भाजप नेत्याची काँग्रेससह विरोधी पक्षांवर सडकून टीका, म्हणाले, “तुम करो तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला...”

भाजप नेत्याची काँग्रेससह विरोधी पक्षांवर सडकून टीका, म्हणाले, “तुम करो तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला...”

नवी दिल्ली | New Delhi

लोकसभेत (Loksabha) मोदी सरकार (Modi Government) विरोधात आणल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) चर्चा सुरु झाली आहे. अविश्वास प्रस्तावानिमित्त आज लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी काँग्रेसने (Congress) मणिपूरच्या (Manipur) विषयावर पंतप्रधान मोदींना तीन प्रश्न विचारले आहेत. काँग्रेसचे आसामचे खासदार गौरव गोगोई (Congress MP Gaurav Gogoi) यांनी हे प्रश्न विचारले. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey) यांनी भाषणाला सुरुवात केली.

यावेळी, निशिकांत दुबे यांनी बोलत असताना राहुल गांधींवर टीका तर केलीच पण आप करे तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला? असे म्हणत विरोधातल्या पक्षांपुढेही काही प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवाद आणि मणिपूरबाबत तुम्ही बोलत आहात? आसाममध्ये १९८३ मध्ये काय घडले होते? किती लोक मारले गेले होते? मिझोरममध्ये सात टक्के मतांवर सरकार तयार केले होते. जरा इतिहासात डोकवून पाहा. राहुल गांधी सदनात आले इतका हंगामा झाला की काय घडले. राहुल गांधी कुठे गेले होते? आम्ही सगळे बजेट अधिवेशनात आले होते.

पुढे ते असे ही म्हणाले, जे पक्ष एकमेकांशी लढले त्यांनी आज 'इंडिया' नावाने आघाडी काढली आहे. काँग्रेसने लालू प्रसाद यादवांना जेलमध्ये पाठवलं, मुलायमसिंह यादवांवर दाखल झालेल्या सीबीआयच्या केसेस आम्ही केलेल्या नव्हत्या, शेख अब्दुल्लांना काँग्रेसनेच २२ वर्षे जेलमध्ये ठेवले होते.

भाजप नेत्याची काँग्रेससह विरोधी पक्षांवर सडकून टीका, म्हणाले, “तुम करो तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला...”
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित

पुढे बोलतांना दुबे म्हणाले की, पंतप्रधानांनी आणि आमच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी अन् नॅचरली करप्ट पार्टी म्हटले आहे. परंतु ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच केली होती. १९८० मध्ये शरद पवारांच्या सरकारला काँग्रेसने बरखास्त केले शिवाय काँग्रेसला वैतागूनच शरद पवारांनी नवीन पक्षाची स्थापना केलेली होती. तरीही हे लोक आज एकत्र आलेले आहेत.

I.N.D.I.A ही आघाडी तयार करण्यात आली आहे. इथे जे खासदार बसलेत त्यांच्यापैकी एकाला विचारा की याचा फुलफॉर्म काय? आता इंडिया इंडियाचे नारे देत आहेत.अध्यक्ष महोदय आत्ता तुम्ही ज्या दानिश अलींना समज दिलीत त्यांना भारतमाता की जय म्हटलं तरीही वाटतं की हा भाजपाचा नारा आहे.

भाजप नेत्याची काँग्रेससह विरोधी पक्षांवर सडकून टीका, म्हणाले, “तुम करो तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला...”
आम्हाला नरेंद्र मोदींचं मौन व्रत तोडायचंय; अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत खासदार गोगाई जोरदार हल्लाबोल

आपले पंतप्रधान सांगतात की हा अविश्वास प्रस्ताव नाही तर विरोधकांबरोबर कोण कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रस्ताव आहे. मी यावर विचार केला आणि काही निष्कर्ष काढले. सर्वात मोठा पक्ष डीएमके आहे. करुणानिधी यांचा हा पक्ष. १९९६ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करुन काँग्रेसने करुणानिधींचं सरकार घालवले. १९८० मध्ये इंदिरा गांधींचे सरकार होतं तेव्हा डीएमके त्यांच्या बरोबर होते. आप करे तो रासलिला हम करे तो कॅरेक्टर ढिला असे कसे काय चालेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com