लस महोत्सव साजरा केला, परंतु लसीची व्यवस्था नाही - प्रियंका गांधी

लस महोत्सव साजरा केला, परंतु लसीची व्यवस्था नाही - प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

नवी दिल्ली - भाजपा सरकारने 12 एप्रिलला लसीचा उत्सव साजरा केला, परंतु लसींची व्यवस्था केली नाही अर्थात पूरवठा केला नाही अशी टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.

त्यांनी ट्वीट केले आहे, भारत हा सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजपा सरकारने 12 एप्रिल रोजी लसीचा उत्सव साजरा केला, परंतु लसींची व्यवस्था केली नाही अर्थात पूरवठा केला नाही. गेल्या 30 दिवसांत देशात लसीकरण दर 82 टक्क्यांनी घसरला आहे,

मोदी यांनी लस उत्पादक कारखान्यांना भेट दिली. छायाचित्रेही घेतली, परंतु जानेवारी 2021 मध्ये सरकारने प्रथम लस ऑर्डर का दिली नाही, अमेरिका आणि इतर देशांनी भारतीय लसी कंपन्यांना खूप पूर्वीपासून ऑर्डर दिली होती. याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवालही प्रियंका यांनी केला. घरोघरी लसीकरण गरजेचे आहे. असे नाही केले तर कोरोनाशी लढा देणे अशक्य आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com