
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज लोकसभेत न्यूज क्लिक (NEWS CLICK) मीडिया पोर्टलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dube) म्हणाले यांनी NEWS CLICK ला देशविरोधी म्हटले आणि चीनकडून निधी मिळत असल्याचा दावा केला.
'न्यूयॉर्क टाईम्स' सारखी वृत्तपत्रे देखील मान्य करत आहेत की, नेव्हिल रॉय सिंघम आणि त्यांचे न्यूजक्लिक पोर्टल कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) चे धोकादायक शस्त्र आहे आणि जगभरात चीनच्या राजकीय अजेंडाचा प्रचार करत आहे,' अशी माहिती ठाकूर यांनी दिली. काँग्रेसने भारताच्या विरोधकांशी हातमिळवणी केली. तर मोफत बातम्यांच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. काँग्रेस तुकडे तुकडे टोळीसोबत आहे. राजीव गांधी फाऊंडेशनलाही चीनकडून पैसे मिळाले आहेत, असेही ठाकूर म्हणाले.
चिनी प्रायोजित संस्थेने यांना फंडिंग केली आहे. ही फंडिंग निवेल सिंघम यांनी केली होती. ज्याला चीनकडून निधी दिला जातो. आम्ही २०२१ मध्ये NewsClick बद्दल सांगितले. ते मोफत बातम्यांच्या नावाखाली खोट्या बातम्या देतात.
ठाकूर पुढे म्हणाले की, काँग्रेसची 'मोहब्बत की दुकान' न्यूज क्लिकशी संबंधित असल्याचा दावाही अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की, राहुल गांधींच्या बनावट 'मोहब्बत की दुकान'मध्ये चिनी वस्तू आहेत. न्यूज क्लिक सुरू झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. हा भारतविरोधी अजेंडा आम्ही चालू देणार नाही. चीनबद्दलचे प्रेम आणि परदेशातून विदेशी वृत्तसंस्थांच्या माध्यमाद्वारे भारताविरोधात अपप्रचार प्रचार केला जात होता. हे लोक अँटी इंडिया आणि ब्रेक इंडिया मोहीम चालवायचे,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.
अनुराग ठाकूर म्हणाले, ''गौतम नौलखा यांच्यावर यूएपीए लादण्यात आले आहे. त्यांनी एका इलेक्ट्रिशियनला दीड कोटी रुपये दिले. यावर राहुल गांधी यांनी कधीही प्रश्न उपस्थित केला नाही. आज जर ईडीने न्यूजक्लिकवर कारवाई केली, तर ते (राहुल गांधी) त्यांच्या विरोधात आहे. देशाच्या विरोधात कोणी असेल तर आपण सगळ्यांनी त्या विरोधात एकत्र यायला हवं, असे अडवाणी म्हणाले होते.