बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडेंनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

राजकारणाच्या आखाड्यात उतरणार असल्याच्या चर्चा
बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडेंनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

दिल्ली | Delhi

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे(Sushant Singh Rajput case) चर्चेत आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे(DGP Gupteshwar Pandey) यांनी स्वेच्छानिवृत्ती(Voluntary Retirement) स्विकारली आहे. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता, जो त्वरित स्विकारण्यात आला. निवृत्तीनंतर आता ते राजकीय आघाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून, बिहार विधानसभा निवडणुकीत(Bihar Assembly Election) त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी एस. के सिंघल(Sanjeev Kumar Singhal) यांना बिहारचे नवे DGP म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.

मागील अनेक दिवसांपासून गुप्तेश्वर पांडे यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती व ते बक्सरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांपुर्वी त्यांना बक्सर जिल्ह्याचा दौरा देखील केला होता व जनता दल युनायटेडच्या जिल्हाध्यक्षाची भेट घेतली होती. त्यांनी पाटणामध्ये इतर नेत्यांची देखील भेट घेतली होती.

गुप्तेश्वर पांडे यांचे एनडीएच्या(NDA) नेत्यांशी चांगले संबंध आहेत. वर्ष 2009 मध्ये देखील त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र त्यांना तिकिट मिळाले नव्हते. अखेर आपल्या चांगल्या संबंधांमुळेच ते पुन्हा सेवेत रुजू झाले. यंदा शिक्षक दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार(CM Nitish Kumar) यांनी सर्वांसमोर त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे सांगितले होते.

गुप्तेश्वर पांडे यांची कारकीर्द..

गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बक्सर जिल्ह्याच्या गेरुआबंध गावात झाला. त्यांचं शिक्षण पाटणा विद्यापीठात झालं. 1987 बॅचचे IPS ऑफिसर गुप्तेश्वर पांडे यांना जानेवारी 2019 मध्ये बिहारच्या पोलिस महासंचालकपदी बढती मिळाली. त्यांचा डीजीपीचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत होता. मात्र त्यांनी मंगळवारी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर गुप्तेश्वर पांडे हे विधानसभा निवडणूक लढू शकतात आणि ते एनडीएचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com