रतन टाटांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

काय आहे संपूर्ण प्रकरण?, जाणून घ्या
रतन टाटांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

दिल्ली | Delhi

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तर सायरस मिस्त्री यांना मोठा धक्का बसला आहे.

टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यात अध्यक्षपदावरून सुरु असलेल्या प्रकरणी सर्वोच्च न्यालयाने आज आपला निकाल दिला आहे.

सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यास योग्य म्हटले आहे. त्यामुळे रतन टाटांचा विजय झाला आहे. तर मिस्त्री यांना या निकालाने मोठा धक्का बसला आहे.

शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार असलेले मिस्त्री यांचा ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला होता. २०१२ साली त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती.

पुढे फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून काढून टाकण्यात आलं होतं. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला होता.

जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि टाटा समूहातील कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्याकडून गैरव्यवस्थापन आणि दुराचार झाल्याचा त्यांनी याचिकेत केलेल्या आरोपातही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com