भारताचे खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर; लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा, पाहा VIDEO

भारताचे खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर; लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा, पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

लंडनमध्ये तिरंगा खाली उतरवणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर (Indian High Commission) लावण्यात आलेला तिरंगा खलिस्तानवाद्यांनी काढला होता. मात्र, आता या इमारतीवर पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा फडकावून खलिस्तानी समर्थकांना सडेतोड उत्तर देण्यात आलं.

याआधी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली. रविवारी झालेल्या या निदर्शनादरम्यान कट्टरवाद्यांनी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा उतरवण्याचा प्रयत्न केला.

भारताचे खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर; लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा, पाहा VIDEO
सासरच्यांनी छळले, विवाहितेने जीवन संपविले
भारताचे खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर; लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा, पाहा VIDEO
प्रवाशी बसचा भीषण अपघात, १९ ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

या कृतीवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी मंत्रालयाचे एक निवेदन ट्विट केले: भारत यूकेकडे तीव्र निषेध नोंदवतो. या घटकांना उच्च आयोगाच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी देणारी सुरक्षा व्यवस्था नसल्याबद्दल यूकेकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले, एमईएने म्हटले आहे.

या संपूर्ण घटनेवर ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी ट्विट करून घटनेचा निषेध केला आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात झालेल्या लज्जास्पद कृत्याचा मी निषेध करतो, ते पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारताचे खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर; लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा, पाहा VIDEO
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com