
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नवीन पासपोर्ट (Passport) मिळवण्यासाठी दिल्ली न्यायालयात (Court) याचिका दाखल केली होती. या याचिकेला न्यायालयाने परवानगी दिल्याने राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे...
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी गांधींच्या याचिकेला अंशतः परवानगी दिली आहे. ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तीन वर्षांसाठी वैध असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राहुल गांधी यांना नवीन पासपोर्टसाठी एनओसीची गरज होती. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होची यावर आज सुनावणी झाली. राहुल गांधी यांनी दहा वर्षासाठी एनओसीचा कालावधी वाढवून मागितला होता. मात्र न्यायालयाने राहुल गांधी यांना ३ वर्षासाठी एनओसी वैध असल्याचे म्हटले आहे.
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर केला. आता त्यांनी सामान्य पासपोर्टसाठी अर्ज केला होता. ज्यासाठी त्यांना एनओसी गरज होती. आता न्यायालयाने राहुल गांधींना नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी परवानगी दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.