दिल्ली l Delhi

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने वित्त वर्ष २०२०-२१ साठी व्याजदरासंदर्भात मोठी घोषणा घोषणा केली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सहा कोटीहून अधिक नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पीएफ वरील व्याज दर जाहीर केला असून भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कायम ठेवला आहे. पीएफवर ८.५ टक्के दराने व्याज दिले जाईल.

केंद्रीय कामगारमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगर येथे EPFOच्या सेंट्रल बोर्ड ट्रस्टीची बैठक झाली. या बैठकीत EPF वरील व्याज दरात काहीही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वित्त वर्ष २०१९-२० मधील वार्षिक ८.५० टक्क्यांच्या तुलनेत चालू वर्षांतील व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. लॉकडाउनमुळे आर्थिक चणचणीतील संघटनेच्या अनेक सदस्यांनी निधीतील रक्कम काढून घेण्याचे तसेच कमी योगदान देण्याचे धोरण अनुसरल्याने सरकारला अधिक व्याज देणे शक्य होणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र या सर्व चर्चा चुकीचे असल्याचे आजच्या निर्णयावरुन स्पष्ट झालं आहे. आता या निर्णयाला अर्थमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर, तो लागू होईल. हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगण्यात येते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने वर्ष २०१८-१९ मधील ८.६५ टक्क्यांवरून पुढील वित्त वर्षांत दर कमी करत ते सात वर्षांच्या तळात आणून ठेवले होते. यापूर्वी, २०१२-१३ मध्ये दर ८.५० टक्के असे किमान होते. तुलनेत २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के असे अधिक होते. यंदा हा दर ८.५० टक्के राहणार आहे.

EPF म्हणजे काय?

EPF म्हणजे नोकरी करणार्या व्यक्तीच्या पगारामध्ये एक आवश्यक योगदान आहे. २० हून अधिक कर्मचार्यांना नोकरी देणार्या कोणत्याही कंपनीला त्या कर्मचार्याचा EPF वजा करावा लागतो.