बिग बॉस फेम अर्चना गौतमला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण? व्हिडिओ झाला व्हायरल

बिग बॉस फेम अर्चना गौतमला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण? व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई | Mumbai

अभिनेत्री, राजकारणी आणि बिग बॉस १६ फेम अर्चना गौतम (Big Boss Fame Archana Gautam) आणि तिच्या वडिलांना दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर मारहाण (Manhandled Outside Congress Office) झाल्याची घटना समोर आलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्चना आणि तिच्या वडिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर ही घटना घडली आहे.

अर्चना गौतम ही तिच्या वडिलांसह दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी पोहचली होती. त्यावेळी तिने वडिलांना घेऊन पक्षाच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला जाऊ दिलं गेलं नाही. तिथे उपस्थित महिलांनी आपल्याला मारहाण केली असे अर्चना गौतमने म्हटले आहे.

यावेळी अर्चना गौतम हिने आरोप करताना म्हंटल आहे की, मी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जात होते. मात्र मला अडवण्यात आले. त्यानंतर मला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच शिवीगाळ करुन कार्यालयाबाहेर पिटाळून लावण्यात आले. माझ्या वडिलांनी मला सावरले आणि कारमध्ये बसवून निघून गेले. मात्र आता मी शांत बसणार नाही. माझ्यासारख्या अभिनेत्रीसह काँग्रेस पक्ष असा वागत असेल तर इतरांचे काय? मी गप्प बसणार नाही. यापुढची लढाई सुरुच ठेवणार. माझ्यासह जो प्रकार झाला तो धक्कादायक होता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे वर्तन चुकीचे होते असेही अर्चना गौतमने म्हटले आहे.

अर्चना गौतमच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि जातीयवादी शब्दही बोलले जात होते. आता मारहाण प्रकरणी अर्चना आणि तिचे वडील कोणतं पाऊल उचलणार, हे पाहायचे आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com