दिल्लीतील 'त्या' अपघाताप्रकरणी मोठी कारवाई

दिल्लीतील 'त्या' अपघाताप्रकरणी मोठी कारवाई

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दिल्लीमधील कंझावाला (kanjhawala ) येथे कारखाली आलेल्या अंजली सिंगला (२०) चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे....

फरफटत नेणाऱ्या बलेनो गाडीचे मालक आशुतोषला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. याप्रकरणात आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

कंझावाला येथे झालेल्या घटनेत पाच जणांना रोहिणी कोर्टातून चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी ५ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र या घटनेत ५ नव्हे तर ७ जण असल्याचा दिल्ली पोलिसांचा नवा दावा आहे. आशुतोष आणि अंकुश अशी दोन नवीन संशयितांची नावे आहेत.

दिल्लीच्या कंझावालामध्ये रविवारी एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे बरेचसे भाग फरफटत नेल्याने तुटले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार ५ तरुण भरधाव वेगाने कार चालवत होते. त्यांनी संबंधित तरुणी स्कूटरवरुन जात असताना तिला धडक दिली. त्यानंतर तिला १० ते १२ किमीपर्यंत फरफटत नेले. ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मृतदेह प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता काही अंतरावर तिची स्कूटर देखील आढळून आली. जी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. स्कूटीच्या नंबरप्लेटच्या मदतीने तरुणीची ओळख पटवण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com