गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी

अहमदाबाद :

गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री (Gujarat new Cm) म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी आज शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यास गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह भाजपचे पाच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते. गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाला काही दिवसांनी शपथ दिली जाईल असं सांगितलं जात आहे.

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले. त्यात म्हटले आहे की, ‘भूपेंद्र भाई यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्याचं काम पाहिलं आहे. मग ते भाजप पक्ष संघटना, नागरिक प्रशासन किंवा समाजसेवा असेल. ते निश्चितपणे गुजरातचा विकास मार्ग समृद्ध करतील’.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com