राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला
देश-विदेश

राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणारं भूमिपूजन

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अयोध्या | Ayodhya - अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच अयोध्या भेट असणार आहे. दरम्यान राममंदिर तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट अशा दोन मुहूर्तांची निवड करून, त्याची माहिती पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कार्यालयाला देण्यात आली होती. यापैकी एका मुहूर्ताची निवड पंतप्रधान कार्यालयाला करायची होती.

आज रविवारी 5 ऑगस्ट या मुहूर्तावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहणार आहेत. यावेळी भौतिक दूरता आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात 100 ते 150 लोकच उपस्थित राहतील. गर्भगृहापासून शिखराची उंची 161 फूट असणार आहे. आधीच्या प्रारूपात ही उंची 138 फूट इतकी निर्धारित करण्यात आली होती. घुमटाची रचनाही बदलण्यात आली आहे. दोन ऐवजी आता पाच घुमट करण्यात येणार आहेत.

मंदिराचा पाया भक्कम करण्यासाठी जमिनीत 60 मीटर खोलवर खोदकाम करण्यात येणार आहे. याशिवाय, मंदिराची रचनाही आकर्षक असणार आहे. राममंदिरासाठी 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती उत्तरप्रदेश सरकारने आधीच दिली हेाती. मंदिराच्या 8 किलोमीटरच्या परिघात धर्मशाळा किंवाहॉटेल बांधण्यास परवानगी नसेल. दरम्यान गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 निष्प्रभ करणारे विधेयक संसदेत पारित करण्यात आले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com