‘कोव्हॅक्सिन’ही महाग

‘कोव्हॅक्सिन’ही महाग

मुंबई - सीरम इन्स्टिट्यूटनंतर भारत बायोटेकनेही करोना प्रतिबंधक लसीची किंमत वाढवली केली आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ची किंमत राज्य सरकारांसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये निश्‍चित केली आहे. तर निर्यात होणार्‍या लसचा दर प्रत्येक डोससाठी 15 ते 20 डॉलर इतका असेल.

यापूर्वी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) बुधवारी सांगितले की, कोव्हिशिल्ड लस ची किंमत राज्य सरकारांसाठी 400 रुपये आणि खासगी रूग्णालयासाठी प्रति डोस 600 रुपये असेल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असेही म्हटले आहे, सध्याचे डोस 150 रुपये प्रति डोस संपल्यानंतर केंद्र सरकारलाही हा दर 400 रुपये असेल. या दरांवरून मोठं वादळ उठलं असताना आता भारत बायोटेकने सीरमपेक्षाही अधिक दर कोव्हॅक्सिनसाठी निश्‍चित केल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

सीरमने आपल्या एकूण लस उत्पादनापैकी 50 टक्के भाग केंद्र सरकारसाठी राखीव ठेवला आहे. केंद्राला यापुढेही 150 रुपये या दरानेच लस पुरवठा केला जाणार आहे. तसाच निर्णय भारत बायोटेकनेही घेतला असून केंद्राला 150 रुपये या दरानेच यापुढेही कोव्हॅक्सिन देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. केंद्रासाठी 50 टक्के साठा राखीव असेल तर उर्वरित 50 टक्के साठ्यातून राज्यांना तसेच खासगी रुग्णालयांना लस पुरवली जाणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com