भगतसिंह कोश्यारी आता "या" ही राज्याचे राज्यपाल

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी श्री.कोश्यारी यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
भगतसिंह कोश्यारी आता "या" ही राज्याचे राज्यपाल

गोवा | Goa

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्याने गोव्याचे राज्यपाल पद रिक्त झाले होते. श्री.कोश्यारी हे आता महाराष्ट्र व गोवा या दोन ही राज्याचे राज्यपाल असणार आहेत....

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवार दि.19 ऑगस्ट रोजी गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी श्री.कोश्यारी यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

स्वतः राज्यपालांनी ही माहिती ट्विट केली आहे.

गोव्याचे राज्यपाल म्हणून कोश्यारी यांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व विधानसभा विरोधी पक्ष नेता दिगंबर कामत यावेळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com