#couplechallenge स्वीकारताय, तर थांबा; हे जरूर वाचा

पोलिसांचा सावधानतेचा इशारा
#couplechallenge स्वीकारताय, तर थांबा; हे जरूर वाचा

मुंबई | Mumbai

सोशल मीडियावर नेहमीच काहीना काही ट्रेंड्स सुरू असतात. सध्या #couplechallenge ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियाचे युजर्सही हे चॅलेंज स्वीकारून आपले खासगी जीवनातील फोटो शेअर करत आहेत. कपल चॅलेंजमध्ये आपल्या पार्टनरसोबतचे फोटो शेअर केले जात आहे. यात तर काही युजर्स इतके फोटो शेअर करतायत की त्या फोटोंचा अल्बम तयार होईल. इतके फोटो अपलोड केले जात आहेत.

पुणे पोलिसांनी याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे, "आपल्या पार्टनरसोबतचा फोटो पोस्ट करण्यासाठी दोनदा विचार करा. कारण हे चॅलेंज तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते." तसेच "कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपल चॅलेंज होईल."असे पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हे फोटो अपलोड करणे तुम्हाला भविष्यात कदाचित धोकादायकही ठरू शकते. कारण तुमचे सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो कोणीही चुकीच्या गोष्टींसाठी वापरू शकतात. मॉर्फिंग, रिव्हेंज पॉर्न यासारख्या सायबर क्राईमशी संबंधित गोष्टींशी तुमचा फोटो वापरला जाऊ शकतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com