बँकेचे कामे उरकून घ्या! कारण जानेवारीमध्ये...

बँकेचे कामे उरकून घ्या! कारण जानेवारीमध्ये...

दिल्ली | Delhi

नवीन वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यात बँका तब्बल १४ दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सन २०२२ मध्ये बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in January 2022) जाहीर केली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२२ मध्ये बँकांचे कामकाज १४ दिवस बंद राहील. बँकांची कामे उरकण्यासाठी केवळ १७ दिवस मिळणार असून तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते आताच करून घ्या.

जानेवारी २०२२ मध्ये एकूण १४ दिवस सुट्ट्यापैकी (Bank Holidays in January) ४ सुट्ट्या रविवारी आहे. यापैकी काही सुट्ट्या लागोपाठ येणार आहे. १४ दिवस संपूर्ण देशामध्ये बँक बंद असणार नाही. RBIने अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सुट्टयांच्या यादीनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू केल्या असून सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाही. बँकांचे कामकाज बंद राहणार असले, तरी मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अश्या आहेत जानेवारी २०२२ मधील बँक सुट्ट्या...

१ जानेवारी - शनिवार (देशभर) नववर्षाचा दिवस

२ जानेवारी - रविवार (देशभर) साप्ताहिक सुट्टी

३ जानेवारी - सोमवार सिक्कीममधील नववर्ष आणि लासूंगची सुट्टी

४ जानेवारी - मंगळवार सिक्कीममध्ये लासूंग सणाची सुट्टी असेल

९ जानेवारी - रविवार (देशभर) गुरुगोविंदसिंग जयंती सुट्टी, साप्ताहिक सुट्टी

११ जानेवारी - मंगळवार, मिशनरी दिवस मिझोराम

१२ जानेवारी - बुधवार स्‍वामी विवेकानंद जयंती सुट्टी

१४ जानेवारी - शुक्रवार अनेक राज्यांतील मकर संक्रांत सुट्टी

१५ जानेवारी - शनिवार पोंगल आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडूत सुट्टी

१६ जानेवारी - रविवार (देशभर) साप्ताहिक सुट्टी

२३ जानेवारी - रविवार नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

२५ जानेवारी - मंगळवार राज्य स्थापना दिवस हिमाचल प्रदेश

२६ जानेवारी - बुधवार (देशभर) प्रजासत्ताक दिन

३१ जानेवारी - सोमवार आसाममध्ये

Related Stories

No stories found.