
दिल्ली | Delhi
बांगलादेश (Bangladesh Train Accident) मध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोन रेल्वे गाड्यांच्या झालेल्या धडकेत कमीत कमी २० लोकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. ए
एक्सप्रेस ट्रेनला पाठीमागून आलेल्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात राजधानी ढाकापासून जवळपास ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरब स्टेशनजवळ झाला. एक मालगाडी पॅसेंजर ट्रेनला धडकल्यानंतर प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी जमले व मदत कार्य सुरू केले.
या दुर्घटनेनंतर देशाच्या इतर भागात जाणारी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजूनही अनेक लोक रेल्वेखाली अडकले आहेत.