नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटवली
देश-विदेश

नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटवली

9 जुलैला घातली होती बंदी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

नेपाळने Nepal भारताचा India भूभाग त्यांच्या नकाशात दाखवल्याने दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान भारतीय वृत्तवाहिन्या नेपाळविरोधात वृत्त देत असल्याचे सांगत 9 जुलैला नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या आणि इतर वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली होती.

नेपाळमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरू होते. आता रविवारी नेपाळने ही बंदी हटवण्यास सुरुवात केली आहे. नेपाळमध्ये पुन्हा वृत्तवाहिन्यांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे. Nepal Starts Telecasting All Indian News Channels

गेल्या महिन्यात नेपाळच्या संसदेत वादग्रस्त नकाशाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. या नकाशात नेपाळने कालापानी हा भारताचा भूभाग त्यांच्या नकाशात दाखवला असून भारताचा त्याला विरोध आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com